
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अरुण भोई
दौंड. राजेगाव:राजेश्वर वि का सो सोसायटीची चेअरमन निवड बिनविरोध पार पडली. यात चेअरमनपदी अमोल मालोजी मोरे, तर व्हाईस चेअरमनपदी संदीप पोपट टेंगले, यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली
निवडणूक कार्यालय येथे वि का सो चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी सर्व निर्वाचित सदस्य हजर होते. रमेश नाना जाधव, गोविंद कडू, मधुकर जामले, मयूर गुणवरे, राजेंद्र खैरे, विठ्ठल मोघे, शरद मेंगावडे,भाऊसाहेब ढेंबरे, जयश्री मोरे, आप्पासाहेब मेंगावडे,तसेच गटनेते मुकेश गुणवरे, भाजप तालुका सरचिटणीस भारत खराडे, मालोजी मोरे, मनोज भोसले, शहाजी गुणवरे, नवनाथ लोंढे, महादेव बगाडे,भारत भोसले, चंद्रकांत मोरे, विलास जामले, दत्ताजी मोघे,तानाजी थोरात,अमोल इंदलकर, विठ्ठल ढमे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी चेअरमन पदी असलेले अमोल मालोजी मोरे यांनी सांगितले की यापुढे आमदार राहुल कुल, व गटनेते मुकेश गुणवरे,यांना सर्व सोसायटी संचालकांना विचारात घेऊन संस्थेच्या व शेतकऱ्यांच्या फायद्याची कामकाज चांगल्या रीतीने करू असं यावेळी ते म्हणाले स्थानिकांनी ग्रामस्थांनी या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या.