
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
माळाकोळी सर्कल चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांचे लोहयात लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले.
लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांचा जिगरी दोस्तांना आहे .
दोस्ती पक्की पक्ष आलग -आलग या म्हणीप्रमाणे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचें समर्थक आहेत तर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील हे आ. शामसुंदर शिंदे यांचे समर्थक आहेत पण या दोघांनी आपल्या मैत्री मध्ये पक्ष किंवा आमदार,खासदार यांना आपल्या मैत्री मध्ये येऊ दिले नाही.
‘ भले चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्तांना हमारा” या दोस्तांना चित्रपटाच्या गीता प्रमाणे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांचा जिगरी याराना आहे.
या जिगरी मित्रांचा वाढदिवस नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी लोहयात मोठ्या थाटामाटात व हर्षोउलासात साजरा केला चंद्रसेन पाटील यांचा सत्कार लोहा शहरांच्या परंपरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून केला व चंद्रसेन पाटील यांना शुभेच्छा दिल्या खारिक खोबऱ्याचे सेवन करुन त्यांना बळ यावे आरोग्य चांगले रहावे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, नगरसेवक नबीसाब, नगरसेवक संदीप दमकोडवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक केतन खिल्लारे, दिनेश पाटील मोटे, पत्रकार केशव पाटील पवार, पत्रकार बाळासाहेब कतूरे आदी मित्र परिवार उपस्थित होते.