दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये आज शुक्रवारी व्यापारी व शेतकरी यांच्यात कांद्याच्या भावावरून व गाड्या खाली करण्यावरून वाद होऊन शाब्दिक शिवीगाळ झाली त्यामुळे शेतकरी संतप्त झाले व शेतकरी व व्यापाऱ्यात राडा झाला.
त्यानंतर शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला व जीपर्यंत व्यापारी माफी मागत नाही तोपर्यंत लिलाव चालू होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला शेतकरी आक्रमक होत असल्याचे पाहताच पोलसमामाही प्रकटले व शेतकरी आणखीच आक्रमक झाले व जोपर्यंत शिवीगाळ केलेला व्यापारी जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत लिलाव करूच देणार नाही असे खडसावले त्यानंतर शेतकरी नेते संतोष जाधव कांदा मार्केट मध्ये आले व शेतकऱ्यांनी घडलेला प्रकार सांगितल्या त्यामुळे संतोष जाधव यानी शिवीगाळ झालेल्या शेतकऱ्यांची जाहीर माफी संबंधित व्यापाऱ्यांनी मागावी नसता शेतकरी कांदा लिलाव होऊ देणार नाही असे ठणकावले त्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याची जाहीर माफी मागितली.
संतोष पाटील जाधव :- एकतर शेतकऱ्यांचा कांदा पन्नास रुपये क्विंटल पासून पुकारला जात आहे व त्यातच शेतकऱ्यांना शिवीगाळ होत असेल तर हे दुर्दैवी आहे कारण कांदा पिकवण्यासाठी एकरी लाखो रुपये खर्च करून जीवाचा रांन करून रात्री बेरात्री पाणी भरून कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतात मात्र त्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने आधीच बळीराजा मेटाकुटीला आला आहे .
