दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-पी.आर.पोटे पाटील एज्युकेशन अँन्ड वेलफेअर ट्रस्ट द्वारा संचालीत पी.आर.पोटे पाटील इन्स्टिटयुट अँन्ड हॉस्पीटल ऑफ मेडीकल सायन्स आयुर्वेद व पी.आर.पोटे पाटील इंटरनॅशनल स्कुल,कठोरा रोड,अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.२१ मे २०२२ रोजी एस.आर.पी.एफ.कॅम्प अमरावती येथे भव्य रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात सर्वसाधारण रोगनिदान,बालरोग तपासणी,स्रीरोग तपासणी,शल्य चिकीत्सा व वातव्याघी या आजाराची तपासणी ब त्यावर उपचार असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
या शिबीराला प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.प्रभाकर शिंदे सर (सहाय्यक समुपदेशक) डॉ.श्याम भुतडा (प्राचार्य पी.आर.पोटे पाटील आयुर्वेद रुग्णालय) श्री.नेवारे सर (पोलीस निरीक्षक)डॉ.रुपाली कोरडे (वैद्यकीय अधिकारी) त्याचबरोबर शाळेचे प्राचार्य श्री.सचिन दुर्गे,उपप्राचार्य सोनल निस्ताने उपस्थित होते.या शिबीराच्या सुरवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सरस्वतीच्या मातेच्या फोटोला हारार्पण करण्यात आले.या शिबीराचे प्रास्ताविक श्री.चेतन शहाकर यांनी केले.
या शिबीरात सर्व प्रकारच्या पॅथॉलॉजीकल तपासणी व सुवर्णप्राशन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या तसेच या शिबीराचा एकुण २७५ रुग्णांनी लाभ घेतला.रुग्णांची तपासणी व उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ.श्याम भुतडा,डॉ.चैतन्य कावलकर,डॉ.अभय पांडे,डॉ.चैताली अरवार,डॉ.दिपाली नवले,डॉ.दिलीप चहाटे, डॉ.अभिजीत प्रधान,डॉ.रोहीत भावसार,डॉ.स्वाती चौधरी,डॉ.श्रध्दा काकडे हे तज्ञ चिकीत्सक उपस्थीत होते.या शिबीराच्या यशस्वीतेकरिता कु.अर्चना बागडे,कु.पुजा इंगळे, कु.सुप्रिया देशमुख,कु.गार्गी ठाकरे,श्री.अजिंक्य माहोरे,श्री. अमोल कुहाडे,श्री.हर्षल बनसोड,श्री.शंतनु वेरूळकर,श्री.राहुल पठाडे व पी.आर.पोटे पाटील इंटरनॅशनल स्कुलचे श्री.भुपेश देशपांडे,कु.पुनम राऊत,कु.वैशाली अंबाडकर यांनी प्रयत्न केले.
