
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर :- माळीवाडगाव (ता. गंगापूर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती. या सेवा संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडणुकीचा कार्यक्रम आज बिनविरोध पार पडला. चेअरमन पदासाठी पंढरीनाथ सोनवणे यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी जगन्नाथ गवळी यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री बेडवाल यांनी त्यांची या पदावर बिनविरोध निवड जाहीर केली. या कामी त्यांना माळीवाडगाव सेवा सोसायटीचे सचिव अनिल देशमुख, गणेश साबळे यांनी सहाय्य केले. लासुरटेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माळीवाडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संस्थापक शेषराव नाना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पणे पार पडली. याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लासुरटेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर वाघचौरे, कारभारी आबा जाधव, उपसरपंच विजय तुपे, उत्तम जाधव, रामभाऊ मोरे, शिवराम सोनवणे, एकनाथ वाघचौरे ,विष्णू पांडव, राजू सुरासे, पुष्पाबाई गवळी, रुकमनबाई वाघ, यांच्यासह गणेश वाघचौरे, वैजनाथ वाघ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सदावर्ते, ज्ञानेश्वर गवळी, कडू जाधव,कचरू गिरी यांची उपस्थिती होती