
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने, इंदापुर तालुक्यामध्ये गुरूवार पासून ४ दिवस शिव संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती इंदापुर तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे यांनी सांगितले. हे शिवसंपर्क अभियान शिवसेनेचे खासदार कृपालजी तुमाणे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे .
याशिवाय पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भाऊ अहिर साहेब ,तसेच पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्यजी शिरवडकर साहेब,जिल्हा प्रमुख महेशदादा पासलकर यांच्यासह पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे आजी , माजी सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. इंदापूर तालुक्यातील सर्व पंचायत समितीच्या गणामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 26 मे रोजी दुपारी ३ वाजता हॉटेल स्वामीराज इंदापूर या ठिकाणी माननीय श्री खासदार कृपालजी तुमाणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी यांची बैठक होणार आहे .
आगामी होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमुळे या शिव संपर्क अभियानाला एक वेगळे महत्त्व आले आहे, आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये इंदापुर तालुक्यामध्ये शिवसेना महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवणार का, आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वबळावर वरती निवडणूक लढवणार हे पण पहाणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे .
या अभियानामुळे इंदापूर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानामुळे इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण नक्कीच ढवळून क्षनिघणार आहे. इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेनेचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राबल्य निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष्यांचे या शिवसंपर्क अभियानाकडे लक्ष लागले आहे.
या अभियानासाठी पुणे जिल्हा समन्वयक विशाल दादा बोंद्रे ,पुणे जिल्हा समन्वयक भिमराव भोसले, जिल्हा उपप्रमुख संजय काळे, इंदापूर तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, तालुका समन्वयक अरुण पवार, तालुका समन्वयक माऊली चौगुले, इंदापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरज काळे, इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी ,शिवसेना युवा अधिकारी सचिन इंगळे, महिला आघाडीच्या तालुका संघटिका सुरेखा लोहार ,उपतालुकाप्रमुख विजय शिरसाट, मंदार डोंबाळे, आप्पासाहेब डोंगरे, सुदर्शन साखरे, संदीप चौधरी ,फिरोज पठाण व सर्व विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुख तसेच सर्व शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.