
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
जवळा _चिंचोली: दि.२५.गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची जवळा चिंचोली जिल्हा परिषद सर्कल ची जागा केवळ १३ मतांनी आपल्या हातून गेली आहे.मात्र आगामी निवडणुकीच्या तयारीला लागून कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने जीव ओतून काम करावे व तेरा मतांनी गेलेली ही शिट तेराशे मतांनी निवडून आणावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ भोजने यांनी केले.
तसेच कार्यकर्त्यांनी त्यात संघर्ष आणि प्रामणिकपना या तीनही गोष्टींची सांगड घातली तर आपला विजय कोणीही रोखू शकत नाही.कार्यकर्त्यांनी क्रियाशील सभासद नोंदणी करून जास्तीत जास्त सदस्य नोंदवावे असेही आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
जवळा बुद्रुक येथे वंचित बहुजन आघाडी ची जवळा चिंचोली सर्कल ची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष दादाराव आंबोरे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकशे, जिल्हा परिषद सदस्य तथा ज्येष्ठ नेते राजाभाऊ भोजने, जिल्हा महासचिव अनिल ईखारे, पंचायत समिती उपसभापती सुखदेवराव सोनुने, युवा नेते प्रभाकर पहुरकर, प्रकाश गवई ,माजी तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण गवई,व सर्कल मधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.