
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
किन्ही सडवत (बुलडाणा): दि.१.
शेतात भुईमूग सोंगण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय वृद्ध शेतमजूरावर अस्वलाने हल्ला करून जखमी केल्याची घटना किन्ही सवडत गावाच्या उत्तरेस निमखेड धरण परिसरात ३१ मे रोजी घडली.किन्ही सवडत येथील दत्तात्रय वाथे हे भुईमूग सोंगण्यासाठी गावातीलच उद्धव आरज या शेतकर्याच्या शेतात गेले असता अस्वलाने हल्ला करून जखमी केले. आरडाओरड केल्यानंतर भाऊ व मुलगा व इतर मजूरांनी त्यांना अस्वलाच्या तावडीतून सोडविले. नागरिकांनी उंद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शेतमजूरास शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.