
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी-किशोर वाकोडे
शिवसेना नांदुरा तालुका वतीने तहसीलदारांना निवेदन..
नांदुरा: देि.२. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची नांदुरा तालुका प्रमुख संतोष डिवरे यांनी शिवसेना तालुका वतीने मागणी केली आहे.
नांदुरा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखांमध्ये शेतकऱ्यांना मे महिना संपत आला असून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते बी-बियाणे, शेतीच्या मशागतीसाठी पीककर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, नांदुरा/ बोराखेडी थानेदार, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा, नांदुरा ,चांदूर बी., धानोरा वि.,यांच्याकडे नांदुरा तहसीलदार राहुल तायडे वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाजीपाला कवडीमोल दराने विकला जात आहे खते बियाणांची बाजार वाढले आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. तसेच पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून कपाशी व इतर पिक पेरणी सुरुवात झालेली आहे. परंतु पिक कर्ज वाटपामध्ये दिरंगाई होत आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप न झाल्यास सावकारांकडे जाण्याची वेळ येईल याचा विचार करून शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात यावे अशी मागणी नांदुरा तालुका शिवसेना वतीने शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डीवरे यांनी केली आहे. सदर शेतकऱ्यांनी पीक कर्ज साठी कागदपत्रे सादर केलेली असून त्याला अजून मंजुरात झालेली नाही. कर्ज मिळत नसल्यामुळे बँकेकडे शेतकरी सतत पाठपुरावा करत असून चकरा मारत आहे. सदर बँकेचे काम संथ गतीने चालू असून शेतकऱ्यांनी कर्ज मिळण्यासाठी अर्ज दिल्यानंतर सदर बँक तो अर्ज आणि प्रस्ताव अकोल्याला पाठवत आहे. त्यामुळे कर्ज मिळण्यास खूप उशीर होत आहे. शेतकरी कर्ज वाटप पूर्वीप्रमाणे स्थानिक बँक यांना अधिकार देण्यात यावे अशी मागणी निवेदनात शिवसेना तालुका वतीने करण्यात आली. सदर नांदुरा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंतर्गत येणारी गावे नांदुरा, शेंबा, धानोरा विटाळी, चांदूर बी. अंतर्गत येणारे शेतकऱ्यांना १६/६/२०२२ पर्यंत तात्काळ कर्ज वाटपची कारवाई न झाल्यास १७/६/२०२२ पासून शिवसेना वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा लोकशाही मार्गाने करण्यात येईल असे निवेदन शिवसेना नांदुरा तालुका वतीने तहसीलदार राहुल तायडे यांना देण्यात आले आहे.
निवेदन देते प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संतोष डिवरे, गजानन करांगळे, रवी इटखेड, सुभाष गायकी शिवसेना उप तालुका प्रमुख, सुरेंद्र चौधरी, संतोष लाहू ळकर विभाग प्रमुख, विशाल भाकरे शाखाप्रमुख, जगन्नाथ भोपळे उपसरपंच शेंबा, विठ्ठल भाकरे युवा सेना उपतालुकाप्रमुख, सुनील पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.