
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- विज वितरण कंपनीच्या विज बिलबाबत नियमीत येणाऱ्या विज वापरांच्या अतिरिक्त युनिट वा मिटर वर दाखविलेल्या युनिटपेक्षा किंवा मिटरिडींग चालु असुन रिडींग उपलब्ध नाही असा किंवा आपण प्रत्यक्षात मिटर वरील वाचन किंवा रिडींग घेऊन आपणास बिल जास्त आले अशी शंका आल्यास आपण विज वितरण कार्यालयामधे आपण रिडींग वाचन घेतलेले चालु विज बिल दाखवुन संगणकावर अपडेट माहीती आपणास विज बिलाची आपली शंका दुर करु शकते त्यामुळे आपण विजबिलाबाबत सदैव जागृत राहुन विज बिल थकीत न ठेवता दिलेल्या तारखेच्या आंत भरले तर अतिरीक्त १० रु आपण वाचवु शकतो तसेच आपल्य विज बिलावर रिडींग वाचन घेण्यासाठी तारीख दिली आहे व विजबिल कोणत्या तारखेपर्यंत आपल्याकडे येते हे आपणास माहित असायला पाहिजे त्यानंतरही विज बिल मिळाले नसल्यास जुने बिल व चालु मिटर वाचन विज वितरण कंपनी मध्ये जाऊन आपण संगणकावरुन आपले बिल का़ढु शकता बिल आले नाही म्हणून आपण बिल भरण्याचे टाळु शकत नाही.असे अनुभवास आले की २/३ महीने विज बिल न मिळाल्यामुळे आम्ही बिल भरले नाही,परंतु ३ महिन्यानंतर आपणास हजारो रुपये बिल आल्याचे आमच्या निदर्शनात आले तरी विज ग्राहकांना आपण जागृत राहुन विज बिलाबाबत सावध राहा,याबाबत ग्राहक पंचायतचे मार्गदर्शन घ्यावे असे ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष महेंद्र शिंदीजामेकर यांनी म्हटले.