
दै.चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी- श्रीकांत नाथे
काँक्रिटच्या सर्वात लांब रस्त्याची अखंडपणे निर्मिती*
——————————————-
अJमरावती :-* ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त राष्ट्रीय महामार्गावर “बिटुमिनस कॉक्रिटच्या सर्वात लांब,रस्त्याची अखंडपणे निर्मिती” या श्रेणीअंतर्गत माना कॅम्प,अमरावती,छ.१९३+१००,तहसिल-मूर्तिजापूर,जिल्हा-अकोला,येत्या ३ ते ७ जूनदरम्यान सलग ७२ तास काम करुन ८० किलोमिटर लेंथचे काम करण्याची योजना आखण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर (पूर्वीचा क्रमांक सहा) अमरावती ते चिखलीदरम्यान चार टप्प्यात काम सुरु आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत (NHAI) अमरावती-चिखली विभागात,लोणी गावाजवळ, रस्त्याची अखंडपणे निर्मिती करुन ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.हे काम राज पथ इन्फ्राकॉन प्रा.लि. तर्फे शुक्रवार ३ जून २०२२ रोजी सकाळी ६ वाजता सुरु होईल आणि मंगळवार ७ जून,२०२२ पर्यंत अखंड सुरु राहील.
त्यामुळे अमरावती-अकोल्यादरम्यान कमी वेळात अधिक काम करण्याची योजना कंत्राटदार कंपनीने आखली आहे. त्यानुसार दि.३ जून रोजी सकाळी सात वाजाता या कामाला सुरुवात होणार आहे.दि.७ जूनपर्यंत सलग कॉक्रिटीकरणाचे काम करुन ७० ते ८० किलोमिटर लेंथचे काम करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.