
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजन*
——————————————-
अमरावती :- अमरावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंगळवार,दिनांक ७ जून २०२२ रोजी एन.एन.एस. हॉल येथे सकाळी ९:०० वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहेत.यामध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
भरती मेळाव्यात अमरावतीसह नाशिक,औरंगाबाद,पुणे,अहमदनगर येथील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत.विविध कंपन्यातील सुमारे १०० पदांवर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.यासाठी आय.टी.आय उत्तीर्ण,तसेच एमसीव्हीसी ऑटोमोबाईल सेक्टरच्या इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्रे व वैयक्तिक माहितीसह उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्य श्रीमती एम.डी.देशमुख यांनी केले आहे.
नाशिक येथील फॅबेक्स इंजिनिअरिंग प्रा. लि.,अमरावती येथील टेक्नोक्रॉफ्ट इंडस्ट्रीज,औरंगाबाद येथील रुचा इंजिनिअरिंग प्रा. लि.,पुणे येथील आयएफबी इंडस्ट्रीज लि. तर औरंगाबाद येथील इपीटोम कंपोनेट्स या कंपन्यांच्या विविध १०० पदांवर भरती करण्यात येणार आहे.
इच्छुकांनी मागील सत्रातील गुणपत्रिका,टी.सी.,दोन पासपोर्ट साईज फोटोज,आधार कार्ड,पॅन कार्ड,निवडणूक ओळखपत्र,ड्रायव्हिंग लायसेन्स,बँक पासबुक ही महत्त्वाची कागदपत्रे सोबत आणावी,असे कळविण्यात आले आहे.