
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाडेगांवचा दुचाकी चोराटा लोणंद पोलिसांकडूंन गजाआड. याबाबत मिळालेल्या माहितीवरुन अट्टल चोरटा यांस दिनांक 30/5/2022 रोजी लोणंद पोलीस ठाणे हद्दीमध्ये नाका-बंदी दरम्यान एक संशयित इसम नामे अतुल अंदमान शिंदे वय 21 रा पाडेगांव ता .फलटण जि.सातारा यांस मोटरसायकल सह ताब्यांत घेवुन त्याची कसुन चोकशी करुन व पोलिसी खाक्या दाखवतांच त्यांने आपला गुन्हा कबूल केला. सदर आरोपीने पुणे, शिक्रापूर फलटण, लोणंद या परिसरांतील दुचाकींच्या चोऱ्या केलेल्या होत्या. सदर आरोपीकडुंन चार गुन्हे उघडकीस आणण्यांस लोणंद पोलिसांना यश मिळाले. त्याने लोंणद पो स्टे कडील मोटार सायकल चोरीचे 2 गुन्हे,व फलटण पो स्टे कडील 1 , तर शिक्रापूर पो स्टे , पुणे ग्रा चा 1 गुन्हे असे एकूण 4 गुन्हे लोणंद पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मा. अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक मा. अजित बोहाडे , फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखांली लोणंद पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. विशाल वायकर व पोलीस कर्मचारी शेख साहेब अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.