
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
करिश्मा पांडुरंग वासेकर राज्यसेवा परीक्षेत उतीर्ण
चंद्रपूर तालुक्यातील उसगाव गावातील शेतकरी कुटुंबातील करिश्मा पांडुरंग वासेकर हि राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेली आहे. हि सर्व उसगाव गावातील शेतकरी कुटूबियांना करिता अभिमानाची बाब आहे. राज्यसेवा परीक्षा उतीर्ण झालेली करिश्मा नायबतहसीलदार पदावर नियुक्त होणार आहे. तिचे अभिनंदन करण्यास माजी जि.प समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी उसगाव येथे त्यांचा निवास्थानी भेट दिली. करिश्माने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना दिले आहे. यावेळी उपस्थित किरण बांदुरकर सरपंच नकोडा, ऋषी कोवे माजी सरपंच नकोडा, मंगेश राजगडकर उपसरपंच नकोडा, संदीप ठाकरे भाजपा अध्यक्ष उसगाव, रजत तुरानकर ग्रा.प सदस्य नकोडा व इतर मान्यवर उपस्थित होते.