
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली हे सर्व जनतेला व इतर राज्यांना कळावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मण आमंत्रण देण्यात आली होते. जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाले होते. चार महिन्यासाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती रोज त्यांना जेवण्याची सोय होती सरदार, राज्यातील श्रीमंत व्यक्ती, दुसऱ्या राज्या चे प्रतिनिधी, व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वजण या सोहळ्याला उपस्थित होते प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते.
राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाई यांना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देव दर्शन केले पूजा केली आणि रायगडाला12 मे 1674 ला परत आले तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य होते म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडावरील प्रतिष्ठापणा केलेल्या भवानीमाता दर्शनासाठी केले त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली 21मे ला पुन्हा रायगडावर ते धार्मिक विधी गुंतून गेले महाराजांनी 28 मेला जानवे परिधान केले दुसऱ्या दिवशी दोन्ही राण्या बरोबर पुन्हा विवाह विधी केला. गागाभट्टांनी 7000 होन तरी इतर सर्व ब्राह्मणांना मिळून 17000 होन दक्षिणा दिली. दुसऱ्याविषयी महाराजांनी सोन,चांदी, तांबे ,जस्त ,कथील ,शीशे आणि लोखंड अशा सात धातूने वेगवेगळी तुला झाली याशिवाय वस्त्र ,मीठ ,खिळे, मसाले ,लोणी ,गूळ, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.
6 जून 1974 ला राज्याभिषेक झाला या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्कार याबरोबर अंघोळ करून कुलदेवतेला स्मरुन राज्याभिषेक सुरू झाला गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळी आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली होती गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या राजाभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे प्रमुख विधी होते दोन फूट लांब आणि दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले शेजारी उपरण्याला साडीचे टोकबांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर तर बाल शिवाजी राजे थोडीशी मागे बसले होते अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते त्यानंतर ते जलकुंभाननी शिवाजी महाराजांवर अभिषेक केला त्यावेळी मंत्र उच्चार आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहीर आणि अलंकार परिधान केले गळ्यात फुलांचे हार घातले एक राजमुकुट घातला आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली मुहूर्ताच्या वेळी राज सिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
32 मन सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते त्यावर शिवाजी महाराज बसले ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले महाजन आशीर्वाद दिला शिवाजी की जय , शिवाजी की जय च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली विविध वाद्यांच्या जयघोषात आसमंत भरुन गेले प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला.
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी ता.लोहा जि. नांदेड मोबाईल क्रमांक 8208493077 . 9923074363