
दैनिक चालू वार्ता वाडा तालुका प्रतिनिधी-मनिषा भालेराव
जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने पश्चिमवाडा वनविभागाच्या वतीने आज (दि ५ जून)रोजी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला,तसेच वाडा शहरातील प्रत्येक प्रभागा मध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण करणेचा संकल्प करण्यात आला,त्या वेळी सहाय्यक वनसंरक्षक वाडा प्रभाकर एस. म्हस्के वनक्षेत्रपाल पश्चिम वाडा विकास लेंडे तसेच वाडा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा गितांजली कोलेकर उपनराध्यक्ष संदीप गणोरे,काॅग्रेसचे जेष्ठ नेते संजय भानुशाली,पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा,काॅग्रेस सेवादल वाडा तालुका अध्यक्ष जगदीश केणे,काॅग्रेस सेवादल वाडा शहर अध्यक्ष संदीप कराळे,प्रदीप भानुशाली,तसेच वनविभाग पश्चिम वाड्याचे वनपाल संभाजी पाटील,वनक्षक निलेश निकम,सुरेंद्र ठाकरे,धम्मपाल म्हस्के, सुभाष वाघमारे,अविनाश कचरे,वनमजूर- दिलीप पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते!