
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
पाचगणी. महाबळेश्वर तालुक्यांतील एका महिलेला लग्नांचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापिंत केले यातून सदर पीडित महिला गर्भवती राहिली व गर्भपात करुन फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील युवकांवर गुन्हा दाखल करण्यांत आला समीर शामराव पाटील (वय २९ रा. राजेश्वरी सोसायटी श्यामनगर पूर्व मुंबई) असे फसवणूक करणाऱ्या तरुणांचे नाव आहे. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरुन मेघवाडी पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल केला होतो पाचगणी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यांत आला . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन समीर पाटील व पीडित महिला हे मागील चार वर्षांपासून एकमेकांना चांगलेच ओळखत होते ओळखीचे रुपांतर त्यांच्या प्रेमात झाले, आणि समीर पाटील यांनी या महिलेला लग्नांचे आमिष दाखवत या कालावधीत पीडित महिलेवर लग्नांचे आमिष दाखवून विविंध ठिकाणी घेवुन जाऊन महिलेवर शारीरिक संबंध प्रस्थापिंत केले. यावेळी फिर्यादी महिला ही नोव्हेंबर २००९ मध्ये गर्भवती राहिली व त्यानंतर तिचा गर्भपांत केला समीर पाटील यांस वारंवार फोन करुन लग्नांबाबत विचारणा केली असता त्याने मला शिवीगाळ करुन मला धमकी दिली. यावरुन आपली फसवणूक झाल्यांचे लक्षांत येताच पीडित महिलेने पोलिस ठाण्यांत धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखांली पोलीस कर्मचारी यशवंत महामुलकर करीत आहेत.