
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी
मराठवाडयातील स्वातंत्र्य सैनिकांची बैठक आज (दि.५) रविवार रोजी सकाळी ११:०० वाजता. नवीन शासकीय विश्वामगृह नळेगाव रोड उदगीर येथे शिवसेनेचे लातूर जिल्हा उपजिल्हाप्रमुख श्रीमंतदादा सोनाळे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेवून स्वातंत्र्य सैनिकांच्या समस्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समोर मांडणार आहेत. याबाबतीत मराठवाडयातील स्वातंत्र्य सैनिकांची आजची बैठक आयोजित केलेली होती. यावेळी ते बोलत होते.
तसेच औरंगाबाद येथे होणाऱ्या मुख्यमंञ्याच्या जाहीर सभेत प्रत्यक्ष जावून स्वातंत्र्य सैनिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी, भेटण्याकरिता तसेच अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्तानं स्वातंत्र्य सैनिकांच्या सहभाग याबाबतीत बैठक आयोजित केलेली होती. यावेळी मुख्य मार्गदर्शक तथा बैठकीचे मुख्य आयोजक शिवसेना लातूर उपजिल्हाप्रमुख श्रीमंतदादा सोनाळे-पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे औरंगाबाद विभागीय अध्यक्ष सतिश भाऊराव माने मदनसूरीकर, अखिल भारतीय छावा संघटनेचे सल्लागार वृषीकेत फुले, संजय गारटे, सुभाष ददापुरे, श्रीमती गोदावरी महाजन व ईत्तर मराठवाडयातील स्वातंत्र्य सैनिक व सैनिकांची पाल्य उपस्थित होते.