
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिन
अहमदपूर (प्रतिनिधी)
दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान कमी करण्यासाठी प्रत्येक माणसाने झाडे लावणे आवश्यक आहे या सृष्टीला प्रदूषणापासून वाचवायचे असेल तर वृक्ष लागवड करा असे सुनेगाव सांगवी येथील वनरक्षक विभागाचे राहुल कलशेट्टी यांनी प्रतिपादन केले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्ग पर्यटन केंद्र सुनेगाव सांगवी येथे महिलांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेशराव देवणे प्रख्यात निवेदक व्याख्याते प्रा मारोती पाटील,सविता मारोती बुद्रुक पाटील,प्रिती महेशराव देवणे,निसर्ग पर्यटन केंद्र सुनेगाव सांगवीचे भीमराव गडकर वॉचमन महादेव यंचेवाड, व्यंकटराव आमुगे,नाथराव मुसळे, गोविंदराव बदने,गोपाळ मुकनर,सतिश माडगे,रोपवाटिकेतील महिला मजूर आदींची उपस्थिती होती
यावेळी वनविभागाचे राहुल कलशेट्टी म्हणाले की दिवसोंदिवस वाढत चाललेले तापमान, पावसाचा असमतोलपणा, सृष्टीचे बदलेले चक्र अबाधित राहावे म्हणून वृक्षाची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक माणसाने दोन वृक्ष लावावेत सामाजिक धार्मिक सांस्कृतिक,आध्यात्मिक कार्यक्रमात वृक्ष भेट द्यावेत भेट दिलेले वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे या सृष्टीला वाचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले तर येणाऱ्या पिढीसाठी वृक्ष लागवड ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे. आम्ही वनविभागाच्या वतीने पूर्ण प्रयत्न करत असून झाडे आम्ही देतो परंतु त्याची लागवड झाल्यानंतर त्यांना जगवणे अत्यंत आवश्यक आहे असेही राहुल कलशेट्टी म्हणाले.
या वेळी वनरक्षक विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.