
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
शनिवार, दि. 11 जून 2022 रोजी श्रीवर्धन येथे ए आय जे हायस्कूल च्या प्रांगणात महानगर गॅस लिमिटेड, मुंबई यांच्या सीएसआर योजनेंतर्गत, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई ( आल्मिको ) निर्मित दिव्यांग उपयोगी उपकरणे, साहित्याचे मोफत वितरण शिबीर रायगड जिल्हा समाज कल्याण विभाग व अपंग कल्याण विभागाचे अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. साईनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजी पाटील यांच्या सहकार्याने स्थानिक एकता दिव्यांग कल्याणकारी संस्था, श्रीवर्धन यांच्या माध्यमातून संपन्न झाले. सदर शिबिरामध्ये २१७ दिव्यांगांना साहित्याचे वितरण उपविभागीय अधिकारी श्री. अमित शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली श्री. साईनाथ पवार – राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना तसेच श्रीवर्धन नगर परिषद मुख्याधिकारी श्री. विराज लबडे, दिघी सागरी पोलिस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संदीप पोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते तीन चाकी सायकल,कुबड़ी संच,हातातील काठी, कृत्रिम अवयव,एल्बो क्रचेस, बॅटरीवरील सायकल,मनोरुग्न किट/मोबाईल आणि व्हीलचेयर इ. साहित्य सुपूर्त करण्यात आले. या वितरणासाठी आल्मिको कंपनीचे रिसोर्स मॅनेजर श्री. कमलेश यादव, श्री. गौरीश साळुंखे, श्री. कृष्णा मौर्य यांनी व्यवस्थापन केले. तसेच याप्रसंगी एआयजे तथा मुस्लिम जमात श्रीवर्धन चे अध्यक्ष श्री. अहमद हसन इरफान शाहा, श्री. शिवाजी पाटील, सोमजाई पतपेढी चे संस्थापक श्री. बाळकृष्ण चाचले, हिदायत जमादार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. साईनाथ पवार यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन करताना सांगितले की सदर साहित्य हे केवळ शारीरिक सहाय्यासाठी नसून याचा उपयोग आपल्या आर्थिक स्वावलंबनासाठी केला पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अमित शेडगे सर यांनी दिव्यांगांचे असे उपक्रम हे सर्वांसाठी ऊर्जेचा स्रोत आहेत आणि प्रशासन नेहमी आपल्या उपक्रमांना सहकार्य करेल असे प्रतिपादन केले. स्थानिक आयोजक एकता दिव्यांग कल्याणकारी संस्था, श्रीवर्धन चे अध्यक्ष श्री. निलेश नाक्ती, उपाध्यक्ष- मुईद सरखोत व भरत पवार, सचिव – उदय माळी, कार्याध्यक्ष – नवाब कुदरते, सल्लागार- संतोष पारधी, सहसचिव – संतोष शेडगे, खजिनदार नाझनीन कर्वेकर, सुनिल गायकर, विकास गायकर, मार्गदर्शक तुपे सर, सौ. प्रियंका कासार व सर्व दिव्यांग बांधव यांनी उपस्थितांचे, आयोजक कंपनी यांचे आभार व्यक्त केले. या आयोजनात स्थानिक आदम सरकार ग्रुप आणि सूत्रसंचालक किरण चालके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.