दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड शहरातील गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल तीन क्रमांकाच्या यादीत श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड चा समावेश होतो. याच ज्युनियर कॉलेज मे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कोव्हिड -19 च्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर ऑनलाईन व ऑफलाईन शिकवणी पद्धतीचा अवलंब करून गुणवत्तेचे शिखर गाठले आहे यामध्ये विज्ञान शाखेचा 100 % निकाल लागला असून वाणिज्य शाखेचा सुद्धा 100 % निकाल आणि कला शाखेचा 90 % निकाल लागला आहे , कॉलेजमधून कला , वाणिज्य ,विज्ञान शाखेतुन प्रथम , द्वितीय , तृतीय व गुणानुक्रमे विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा. वैजनाथराव कुरुडे सर तसेच शालेय समिती सदस्य मा. सुर्यकांत कावळे ,एम.पी. कुरुडे , इंद्रजित बुरपल्ले , मुख्याध्यापक सुधीर भाऊ कुरुडे , उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक प्रा.ब्याळे एम.के. , प्राथमिकचे मुख्याध्यापक दिलीप वाडेवाले , पर्यवेक्षक पंढरीनाथ काळे , माध्यमिक पर्यवेक्षक सदानंद नळगे ,शिवराज पवळे , परीक्षा विभाग प्रमुख प्रा.मुरलीधर घोरबांड , संस्कृती विभाग प्रमुख प्रा.स्वाती कान्हेगावकर , ज्येष्ठ प्रा. वसंत राठोड यांनी स्वागत करून विद्यार्थ्यांचा हृदय स्पर्शी सत्कार केला व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे वरील मान्यवरांनी अभिनंदन केले .
तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने निर्देशित केल्याप्रमाणे 13 जून पासून प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा खऱ्या अर्थाने सुरु झाल्या आहेत नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण होत असल्याने वरील मान्यवरांनी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे संस्थेच्या वतीने अर्थातच संस्था सचिव ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनानी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरडे साहेब , संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा.वैजनाथराव कुरुडे व शालेय समिती सदस्य मधुकरराव कुरुडे , मा. सूर्यकांत कावळे , नवनिर्वाचित शालेय समिती सदस्य इंद्रजीत बुरपल्ले पर्यवेक्षक प्रा. माधव ब्याळे , माध्यमिकचे पर्यवेक्षक सदानंद नळगे , शिवराज पवळे , प्राथमिक मुख्याध्यापक दिलीप वाडेवाले पर्यवेक्षक पंढरीनाथ काळे व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. मुरलीधर घोरबांड इत्यादी मान्यवरांनी श्री शिवाजी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व पुढील शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात गुणवंत यशवंत व किर्तीवंत व्हा असा मोलाचा संदेश दिग्गज मान्यवरांनी दिला.
