दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 14 जूनला होणार देहूच्या शिळामंदिराचे लोकार्पण….
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज व देवगड संस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज यांना देण्यात आले आहे़.
दिनांक 14 जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांचे प्रथमच देहू नगरीत आगमन होत आहे. या सोहळ्यासाठी देहू संस्थाने व उत्सव समितीच्या वतीने नगर,नाशिक,औरंगाबाद या जिल्ह्यांमधून संत महंत चे प्रतिनिधी म्हणून श्रीक्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज व श्रीक्षेत्र देवगड संस्थान चे महंत भास्करगिरीजी महाराज यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. अध्यात्मिक आघाडीचे संयोजक तुषार भोसले व उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष बबन मुठे यांच्यावतीने देवगड व श्री क्षेत्र सरला बेट या ठिकाणी दोन्ही महंतांना निमंत्रित करण्यात आल्याने योगिराज गंगागिरीजी महाराज भक्त मंडळामध्ये उत्साहचे व आनंदाचे वातावरण आहे.
