दैनिक चालु वार्ता नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
निरा-नृसिंहपुर (तालुका इंदापूर )येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नीत रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2022-23 अंतर्गत नृसिंहपुर येते कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन विद्यमान सरपंच चंद्रकांत सरवदे यांच्या हस्ते संपन्न झाले. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला .
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर .जी .नलवडे प्राध्यापक एस .एम .एकतपुरे यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिदूत पृथ्वीराज देशमुख,शिवम शेंडे,प्रसन्नजीत देशमुख,शिवराज देशमुख,शिवतेज शेंडगे,प्रसाद काळे,गौरव वाघ,वैभव देशमुख यांनी शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी सर्व कृषी मित्रांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शेतकऱ्यांना केळी बागेची निगा व त्यावरील रोगावर नियंत्रण व माती परीक्षण चे महत्व सांगून त्यांना मार्गदर्शन केले. शेतमाल निर्यात व साठवणूक यांचे फायदे तोटे याबाबत मार्गदर्शन केले या प्रसंगी माजी सरपंच नरहारी काळे, सरपंच सौ.अश्विनी चंद्रकांत सरवदे, माजी सरपंच आण्णा काळे, माजी सरपंच संतोष मोरे,
, माजी ऊप सरपंच विलास ताटे,माजी सरपंच जगदीश सुतार, उद्योजक विजय सरवदे, ऊप सरपंच सुनील मोहिते, सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, किशोर मोहिते, चित्रपट अभिनेते नितीन सरवदे, प्रशांत बादले, आनंद काकडे, दशरथ राऊत, तुकाराम भंडलकर, ग्रामसेवक .गणेश लंबाते, व इतर ग्रामपंचायत सदस्य व,ग्रामस्थ सहकारी व शेतकरी बंधु उपस्थित होते.
