
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर प्रतिनिधी-…. तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक 15/6 /2022 रोजी शाळा शुभारंभ निमित्ताने शाळा प्रवेशोत्सव उपक्रमा अंतर्गत प्रवेश पात्र विद्यार्थी यांना शाळेत बोलावून त्यांचा सन्मान पुर्वक वाजत गाजत हार, फुगे, आनंददायी गीत व विविध शैक्षणिक घोषणा देत गावात सर्व विद्यार्थ्यांना घेऊन गावात प्रभात फेरी काढण्यात आली.तद्नंतर शाळेच्या परीपाठानंतर उपशिक्षणाधिकारी मा. भगवान जी फुलारी साहेब, विस्तार अधिकारी मा. दिलीप जी हैबतपुरे उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तद्नंतर प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत जिल्हा परिषद लातूर चे उपशिक्षणाधिकारी मा. भगवान जी फुलारी साहेब, विस्तार अधिकारी मा. दिलीप जी हैबतपुरे साहेब,साधन व्यक्ती मा. भोळे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, राजकुमार श्रीमंगले यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून मराठी,गणित विषयासातील गमती जमती, गोष्ट, गाणी, बडबड गीते म्हणून दाखवले . सर्व विद्यार्थी आनंदी,खुश दिसून आले. विद्यार्थी रममान झाले. या नंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात येण्यासाठी हार्दिक देण्यात आल्या. तद्नंतर भारतीय संस्कृती प्रमाणे अतिथी देवो भव या प्रमाणे उपशिक्षणाधिकारी मा. भगवान जी फुलारी साहेब यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी केले व विस्तार अधिकारी मा. दिलीप जी हैबतपुरे यांचा सत्कार शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी केले. तसेच साधन व्यक्ती श्री भोळे सर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी केले. तद्नंतर उपस्थित उपशिक्षणाधिकारी मा. भगवान जी फुलारी साहेब, विस्तार अधिकारी मा. दिलीप जी हैबतपुरे व सर्व मान्यवर यांच्या हस्ते मोफत पाठय़पुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले. या नंतर उपशिक्षणाधिकारी मा. भगवान जी फुलारी साहेब यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शैक्षणिक वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व शाळेतील शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्वांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी उपशिक्षणाधिकारी मा. भगवान जी फुलारी साहेब, विस्तार अधिकारी मा. दिलीप जी हैबतपुरे साहेब, साधन व्यक्ती श्री भोळे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, राजकुमार श्रीमंगले व शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.