दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण तंतोतंत राबविणारे शिवसेना प्रणित किसानसेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा लोहा शहर व तालुक्यात अनेकांनी सत्कार करुन अभिष्टचिंतन केले.
लोहा येथे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांच्या वतीने किसानसेना प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांचा वाढदिवसानिमित्त शाल पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला.
तसेच पारडीचे तिरुमला पाटील डिकळे यांच्या ही वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा ही सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, माजी नगरसेवक उत्तम महाबळे,माजी सैनिक व्यंकटराव घोटके, जेष्ठ पत्रकार डी.एन.कांबळे, पत्रकार विलास सावळे, पत्रकार विनोद महाबळे, पत्रकार फेरोज मणियार, पत्रकार विजय चन्नावार, पत्रकार गोविंद कदम , विकास क्षीरसागर, गणेश काळे आदी उपस्थित होते.
तसेच किसानसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे खासदार हेमंत भाऊ पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे, लोहा -कंधार विधानसभा संघटक मिलिंद पाटील पवार यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
तसेच आडगाव येथे विद्यार्थ्यांना किसानसेना तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील आडगावकर, रिपाइं नेते पत्रकार बालाजी धनसडे आदी उपस्थित होते.
