
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा – कंधार तालुक्याच्या विकासात मोलाची कामगिरी बजावणारे धाडशी व चारित्र्य संपन्न नेतृत्व म्हणजे माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब आहेत.
आज दिनांक १५जून रोजी माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब यांचा वाढदिवस असुन साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब यांचा लोहा येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला वडील खोब्राजी पाटील चव्हाण हे एक इमानदार व मेहनती शेतकरी होते तसेच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा विचारांचा पगडा होता. ते नेहमी पंढरपूर ची वारी करीत होते ते माळकरी होते त्यांच्या गळ्यात माळ होती ते आपला शेती व्यवसाय सांभाळून नेहमी भजन कीर्तन प्रवचन ऐकायला जात होते.
वडील खोब्राजी पाटील चव्हाण यांच्या सान्निध्यात वाढलेले माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब हे धार्मिक क्षेत्रात सदा अग्रेसर असायचे अभ्यासात हुशार असणारे खरे व स्पष्ट बोलणारे निर्भिड व निडर असणारे रोहीदास चव्हाण साहेब हे आपल्या शालेय शिक्षणा नंतर ते शाहीर अण्णा चव्हाण यांच्या सोबत नाट्य क्षेत्रात कलाकारांचे काम करु लागले . त्याच बरोबर ते राजकारणात ही सक्रीय सुरुवातीला काँग्रेस पक्षात काही दिवस काम केले नंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात १९८८नंतर मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात वादळ आले त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव हिंदुत्वाचे राजकारण मराठी माणसाचे हीत शिवसेनेचे धोरण ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ध्येय धोरण रोहिदास चव्हाण साहेब यांना मान्य झाले त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आपले वक्तृत्व नेतृत्व संघटन कौशल्य पाहून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी रोहिदास चव्हाण साहेब यांना शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केली यावेळी रोहीदास चव्हाण साहेब यांनी नांदेड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या १९९० ला त्यांना शिवसेनेच्या वतीने कंधार विधानसभेचे तिकीट देण्यात आले. त्यांनी अटीतटीची लढत दिली पण शेकापचे आमदार भाई केशवराव धोंडगे यांनी त्यांचा थोड्या मतांनी पराभव केला.
पराभाला खचून न जाता तरुण तडफदार नेतृत्व रोहिदास चव्हाण साहेब यांनी नांदेड जिल्ह्यात कंधार व लोहा तालुक्यात प्रत्येक गावात गाव तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक असे अभियान राबवून पायाला भिंगरी बांधाव तसे गाव – गाव फिरुन शिवसेनेचा विस्तार केला . १९९३ ला लोहा न.पा.ची प्रथमच निवडणूक लागली यावेळी त्यांनी लोहा न.पा.तील सत्ताधारी काँग्रेस च्या विरोधात २५ जागे पैकी २५ जागेवर आपले शिवसेनेचे उमेदवार निवडणूकीत उभे केले व ते ही स्वतः जूना लोहा येथील वार्डातून लोहा न.पा. निवडणूकीत उतरले व त्यांच्या सोबत शिवसेनेचे प्रथम च १० नगरसेवक निवडून आले.
पुढे १९९५ ला ते कंधार विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेनेच्या वतीने उभे राहिले त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची लाट आली यावेळी रोहीदास चव्हाण साहेब यांच्या समोर अनेक वर्षे शेकापचे आमदार असलेले भाई केशवराव धोंडगे यांचे कडवे आव्हान होते पण रोहीदास चव्हाण साहेब यांचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला व ते प्रथमच कंधार मधून शिवसेनेचे आमदार झाले. व राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार आले यामुळे दुधात साखर पडल्या प्रमाणे झाले व तेथूनच कंधार व लोहा तालुक्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली
१९९५ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळाले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले .
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री त्यावेळी असल्याने कंधार व लोहा तालुक्यातील विकास कामांना आमदार म्हणून त्यांनी चालना दिली रस्ते पाणी वीज आदी प्रश्न सोडविले तसेच पुढे १९९९ ला ही ते पुन्हा शिवसेनेकडून कंधार मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात जनतेच्या सोयीसाठी लोहा येथे तहसील कार्यालयाची इमारत मंजूर केली , न्यायालयाची इमारत मंजूर केली, आरटीआय मंजूर केला, लोहा येथील बस स्थानकांचे काम मंजूर केले.
यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोहा -कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे त्यांची शेती ओलिताखाली यावी त्यांचे उत्पन्न वाढावे तसेच लोहा कंधार तालुक्यातील जनतेला पाणी मिळावे म्हणून लिंबोटी धरणाच्या कामासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून कामास सुरुवात केली आज कुणी ही पोस्टर बॅनर लावून म्हणतो स्वयं घोषित लिंबोटी धरणाचा शिल्पकार या बोलण्याला काही अर्थ नाही. रोहीदास चव्हाण साहेब सलग १० वर्ष कंधार व लोहा तालुक्यांचे आमदार होते. त्यांच्या काळात त्यांची प्रशासनावर चांगली पक्कड होती जनतेचे कामे वेळेवर होयाचे अधिकारी -कर्मचारी घाबरायचे ते स्वच्छ निर्मळ निर्व्यसनी चारित्र्य संपन्न सांप्रदायिक आहेत त्यांनी कार्यकर्ते घडविले त्यांनी अनेकांना नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापती उपसभापती आदी महत्त्वाच्या पदांवर बसविले त्यांना अनेक जण बेईमान झाले पण त्यांनी कुणालाही दुखविले नाही . पुढे चालून लोहा -कंधार मध्ये पैसे वाल्याचे घाण राजकारण सुरू झाले याला अनेकजण भुलले १५०-२०० वाला आमदार झाला त्यांनी राजकारणाचा धंदा सुरू केला. पैशातून सत्ता सत्तेतून पैसा असे चालले आहे. त्यामुळे विकास खुंटला माजी रोहिदास चव्हाण साहेब यांचा सारखा निर्भिड निर्व्यसनी चारित्र्य संपन्न लोकप्रतिनिधी मतदार संघाला मिळणे म्हणजे भाग्य लागते.
माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब यांच्या आमदारकिच्या काळात लोहा व कंधार तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला त्यांनी लोहा – कंधार तालुक्याच्या विकासासाठी मोलाची कामगिरी बजावली आज जरी ते सत्तेत नसले तरी त्यांचा आदर्श सर्वांपुढे आहे. आज दिनांक १६ जून रोजी या लाडक्या कर्तबगार नेतृत्वाचा वाढदिवस असुन ईश्वर त्यांना चांगले निरोगी व दीर्घ आयुष्य देवो त्यांच्या हातून नियमित जनसेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा
संभाजी पाटील चव्हाण
नगरसेवक न.पा.लोहा