
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी- विश्वास खांडेकर
नांदेड शहरातील सर्वात उच्च लोकवस्तीचा भाग म्हणून शिवाजीनगर भाग ओळखला जातो. या भागात विद्यमान आमदारांची घरे आहेत. तसेच या भागात दवाखान्यांची संख्या देखील भरपूर आहे .परंतु येथील अतिक्रमण यामुळे तसेच रस्त्यावरील युटर्न घेण्याच्या हव्यासामुळे दिवसातील अधिक काळ येथे रहदारी कोंडी आपल्याला पाहायला मिळते.
येथे मोठ्या मोठ्या लोकांची घरे असल्यामुळे पोलिसांचे हमखास दुर्लक्ष तर समजूनच घ्या, मग इतर सामान्य लोकांचा कितीही वेळ वाया गेला तरी चालेल परंतु प्रशासन आणि राजकारणाच्या आशीर्वादामुळे इथली रहदारी कोंडी कधीच दूर होणार नाही हे नक्की. आपुरे रस्ते, पादचाऱ्यांसाठी चालण्यासाठी केलेले फूटपाथ, सायकल चालकांसाठी केलेले सायकलिंग चे रस्ते सगळं तर कागदावर आहे. पण इथे आल्यानंतर तुम्हाला हे कधीच पाहायला मिळणार नाही. इथे पाहायला मिळेल तुम्हाला पार्किंग मध्ये उभा असणारे गाडे त्या गाड्यांमध्ये पोलीस अधिकारी आपल्या गाड्या लावून बसलेले दीसुन येतील. एखाद्या व्यक्तीकडे कुठला कागद कमी आहे का एवढं ते बघतील परंतु विनापरवाना येथील अनेक लोक गाडी चालवताना हे जाणून बुजून दुर्लक्ष करतील. यामुळे रहदारीची बोंबाबोंब होत आहे. अशात एखादी घटना घडली तर आश्चर्य करायला नको.
नांदेड महानगरपालिका आहे परंतु इथे राजेशाही चालते की काय असेच वाटायला लागले आहे. नांदेड शहरातील कुठल्याही बाजूने प्रवेश करण्यात यावा तिथला रस्ता थोडातरी उकरलेला तुम्हाला सापडेलच. याशिवाय शहरातील रहदारीची तर बोंबच आहे. खास करून तुम्हाला शिवाजीनगर मध्ये फार मोठ्या प्रमाणात पहावयास मिळेल. चारी बाजूने वाहने बाहेर येतात पण कोणाचं ठरलेलं नसत की कुठल्या दिशेने जायचं आहे. पोलीस या सर्कशीची मजा घेत आहेत की काय वाटत आहे, ते अगदी थंडगार पणे एखाद्या मोठ्या मानसाची गाडी येते का आणि तेव्हा मी किती छान माझी ड्युटी बजावत आहे हे दाखवण्यात उत्सुक आहेत.
चांगल्या लोकांना जाणून बुजून त्रास दिला जातो. तुम्हाला करायचं असेल तर सर्वांना एकसारखे नियम बाळगा, विनापरवाना मग कोणी असेल त्या सर्वांना आधी धरा आणि मग गाड्यांची इन्शुरन्स हे तपासा. परवाना नसताना गाडी चालवत आहेत असे लोक सोडून परवाना असल्यास इन्शुरन्स दाखव असे म्हणून त्रास दिला जात आहे. त्याबाबत सरकारने नियम ठरवून दिलेली असतील ते सर्वांनाच मान्य आहेत पण त्या नियमाची पायमल्ली करताना देखील आपल्याला पोलीस अधिकारी दिसून येतील. एखाद्याने प्रश्न विचारावा मग काय बघायचे ,पोलिसांचे चूक दाखवणा-यानेच माफी मागून पुढे
जावे लागते. यावर काहीतरी उपाय शोधावा अशी नागरीकाकडून ओरड होत आहे.