दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी.
श्री मायाक्कादेवी भक्तगण सेवाभावी मंडळ हजारे मळा, उंब्रज. ता.कराड यांच्याकडून सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोफत आरोग्य सेवेचा उपक्रम सुरू आहे. यावर्षी या सेवेमध्ये 30 पुरुष व 10 महिला तसेच स्वयंस्फूर्तीने काम करणारे स्वयंसेवक, जसे की हातपाय मालिश करणे. पायी चालणाऱ्या भाविक भक्तांना व्याधी पासून मुक्त करणे. याकरता ही सेवा या संस्थेकडून गेली 14 वर्षे अविरतपणे चालू आहे मागील दोन वर्षाच्या कोरोना काळामध्ये आरसीनिक अल्बम या औषधाची वाटप सुद्धा या संस्थेने केले होते. अशी माहिती, या संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब मोरे खजिनदार सुरेश पाटील. सचिव विजय विभुते व डॉक्टर शेवाळे,भरत लोहार सोनवडेकर यांनी दिली. आज या संस्थेने रायगव, चोराडे, चितळी व मायणी इथपर्यंतची सेवा पूर्ण केली.
