
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी राऊत यांना याप्रकरणी मोठा झटका बसणार असल्याचा इशारा दिला होता. अखेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबईतील शिवडी न्यायालयाने हे जामीनपात्र वॉरंट काढले आहे. संजय राऊत यांनी 18 जुलै 2022 रोजी शिवडी न्यायालयात उपस्थित व्हावे असे या वॉरंटमध्ये नमूद आहे.
कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.