दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी – दशरथ आंबेकर
जनसेवक स्व.माधव रेड्डी कल्यामवार (काँग्रेस ता.अध्यक्ष व सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट) यांच्या ११ व्या स्मृतीदिनाचे औचित्यसाधून हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयातील सर्वच विध्यार्थी/ विद्यार्थिनींना मोफत गणवेशाचे वाटप व वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्यध्यपक पंडितराव सबापुरे होते तर प्रमुख उपस्थिती विद्यालयाचे संचालक,काँग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी,कनकी चे पोलीस पाटील गोविंद गुरनुले,आंबदास वाडगुरे, कैलास राठोड,उत्तम शेंडे,पवन चव्हाण,गोपाळ गुरनुले, पोचिराम सूनकलवाड,आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह शिक्षक पी.के.तायडे,डी.आर.इंगोले, आनंद भालेराव, दिनकर शेंडे,बी.के.राठोड, बी.एस.बोनतावार,राजेंद्र ठाकरे,विष्णू मडावी,पोचिराम मोहूर्ले, रामराव राठोड,खांडरे भाऊ यांनी परिश्रम घेतले.
जनसेवक स्व.माधव रेड्डी कल्यामवार हे कनकी गावचे २५ वर्ष सरपंच ,काँग्रेस ता.अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट चे सभापती असताना तालुक्यातील अनेक विकासकामांना त्यांचा हातभार लागला होता. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे व स्पष्ट वक्ता असल्याने सर्वांना ते आपले वाटायचे.
यांच्या कार्यकुशलतेळेच ते माजी मुख्यमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांच्या जवळचे झाले.काँग्रेस पक्ष ता.अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द ऊत्तम राहिली होती.
आज त्यांचे सुपुत्र मा.सूर्यकांत रेड्डी हे स्व. माधव रेड्डीचें अधुरे स्वप्नपुर्ती करीत असून माजी मुख्यमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांनी किनवट तालुका अध्यक्षपद उत्कृष्टरित्या सांभाळत आहेत.
