दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळगड चा इतिहास मोठा आहे.येणारे पर्यटकांची संख्या पण जास्त आहे.दि. ६\७\२२ ला चार दरवाजा या ठिकाणी मंगळवार पेठ कडे जाणारा पायी रस्ता च्या वरच्या बाजूच्या असणाऱ्या तटबंदीचे काही भाग ढासळला आहे. त्यामुळे इतिहास प्रेमी,पन्हाळगड वासिय,आजूबाजू गावकऱ्यांकडून चिंता व्यक्त होत आहे.गेल्यावर्षी २१ जुलैला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता.अशाच पद्धतीने मुख्य रस्त्याला भेग पडली होती.त्यानंतर लगेचच २२ तारखेला मुख्य रस्ता दीडशे फूट खाली गेला होता.गेल्या वर्षीच जिओ-ग्रेट टेक्नॉलॉजी वापरून सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी हा रस्ता तयार करून घेतला त्याला नऊ महिने लागले. तोपर्यंत पर्यायी रस्ता रेडे घाट हा मार्ग जंगलातून काढला होता. या रस्त्याने पर्यटकांचे व स्थानिक नागरिकांचे व शासकीय ऑफिसमध्ये येणारे कामगार वर्ग व नागरिकांचे खूप हाल झालेत अशीच परिस्थिती यावर्षी पण होते.या भेटीचे वातावरण पन्हाळगड परिसरात पसरले आहे.
इंग्रजांनी एक डिसेंबर १८४४ ला मुख्य चार दरवाजा पाडला व इथे पर्यायी पूल बनवून हा मुख्य रस्ता बनवला त्याला लागूनच असणाऱ्या मंगळवार पेठ कडे पायी जाणाऱ्या रस्ता आहे.या ठिकाणी थोडी तडबंदीची दरड पडली आहे .यावर शासनाने व भारतीय पुरातत्व खाते यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.अशी जनतेकडून व सामान्य नागरिकांकडून मागणी होत आहे.
इतिहास संशोधक शिवप्रसाद शेवाळे ,यांच्या मते भूसंकलन का होत आहे पन्हाळगड तर काही धनाट्य सावकार लोकांनी आपले दुसरे घर म्हणजेच फार्म हाऊस पन्हाळगडच्या आजूबाजूला बनवले आहेत.जेसीबीच्या साह्याने अनेक ठिकाणी भूसंकलन करून नैसर्गिक परिस्थितीची रचना बदलली आहे.जो भाग आहे.त्यामध्ये बदल केले आहेत.ज्या ठिकाणी पाणी साठण्यासाठी ऐतिहासिक तळ्या होते त्याच्यात सुद्धा बदल काही ठिकाणी केले आहेत ते मुजवले आहेत.गडावरून खाली जाणारे पाण्याची मार्ग सुद्धा बदलले आहेत. तसेच पन्हाळगडाची माळीन होण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे शासनाने कठोर नियम घालून नैसर्गिक संपत्तीचा हास होता कामा नये तसेच योग्य पद्धतीने पुन्हा वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.परदेशातील झाडे लावण्यापेक्षा आपली भागातीलच जांभळ,आंबा,फणस,वड,पिंपळ, सागवान, अशी झाडे लावावीत पूर्वी धनदाड जंगल झाले पाहिजे असे न झाल्यास असे प्रकार घडत च राहणार.
अमित पवार, दैनिक चालु वार्ताला माहिती देताना बोलत होती की, पन्हाळा बाहेरील गावातील लोक यासाठी धडपड करत आहे. संभाजी ब्रिगेड यावत मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.गावातल्या लोकांनी पण यात लक्ष देणे गरजेचे आहे.पन्हाळगड हा पुढच्या पिढीला फक्त चित्रात दाखवण्यात लागेल अशी परिस्थिती येईल गेल्या वर्षी चार दरवाजा या ठिकाणी असेच पाणी मुरत होते व नंतर संपूर्ण गावात येण्यासाठी जाण्यासाठी रस्ता बंद झाला त्यामुळे गडावरचे सर्वच उद्योग काही दिवस बंद पडले, याचे उद्योगधंद्याने करणाऱ्या लोकांनी दिवस अनुभवले आहेत. असे गेल्या तीन वर्षात दोन वेळा घडले आहे. थोड्या थोड्या किरकोळ गोष्टीवर लक्ष न देण्याचे परिणाम आपण पाहिले आहेत.इथल्या स्थानिक नागरिकांनी इतिहास प्रेमी यांनी यावर लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच माझ्यासारखे युवकांनी उद्योगधंदे करणारे लोकांनी यात लक्ष देणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी यांनी पण लक्ष देणे गरजेचे आहे .सत्ता,विरोध राजकारण चालतच राहील. गावातले सर्व नागरिक एकत्र येऊन मीटिंग घेणे व योग्य पुढेची दिशा ठरवणे महत्त्वाचे आहे. यासाठी आम्ही लवकरात लवकरच गावमीटिंग ची तारीख वेळ जाहीर करू.
तसेच या तटबंदीचे भारतीय पुरातत्व खात्यामार्फत अंदाजपत्रक तयार केले होते तसेच पुढे पाठवले आहे , व त्याची प्रोसिजर फार किचकट आहे .त्यामुळे वेळ लागत आहे.अशी सुद्धा माहिती भारतीय पुरातत्वअधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
