
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर (दि.९) : शिंगी येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे संत तुकाराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेच्या पूजनांनंतर विद्यार्थ्यांनी गावामध्ये वारकरी व महिला मंडळींच्या दिंडी मध्ये सहभागी होऊन पावली, लेझीम , फुगडी ,अभंग, गवळणी इत्यादींचे मोठ्या उत्साहाने सादरीकरण करून सहभाग नोंदवला. गावातील भजनी मंडळी तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने व उत्साहाने या दिंडीमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री. दिगंबर पा. वाखुरे, शालेय समिती सदस्य श्री बाबूलाल शेख,श्री जगन्नाथ नरोडे, श्री भगवान तिखे, भाऊसाहेब घाटे, प्रकाश कासार, कैलास तिखे, दशरथ कासार, श्री इंद्रजित कासार,सुनिल झिंजूर्डे पाटिल, रवी तिखे, प्रदीप तिखे, राजू आरण यांच्यासह मुख्याध्यापक श्री प्रमोद सोनवणे, श्री सुरेश चव्हाण, श्रीमती मंगल जाधव, श्रीमती कल्पना उरणकर, श्री गजानन हरकळ, श्री गोकुळ काकडे, श्री कैलास बनकर, श्री संदीप सावंत, श्री हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती.