
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार ,संसदीय कामकाज मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब यांची आज निमगाव केतकी येथील पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट घेऊन राज्यात सत्ता स्थापने साठी व विधानपरिषद मध्ये आमदार निवडून येण्या करिता महत्त्वाकांक्षी भूमिका पार पाडल्यामुळे त्यांचा भारतीय जनता पार्टी व निमगाव केतकी च्या वतीने इंदापुर पंचायत समितीचे माजी उपसभापती देवराज भाऊ जाधव ,निरा भीमा कारखान्याचे चेअरमन लाला आबा पवार , इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलास बापु वाघमाडे, भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका संघटक सरचिटणीस राजकुमार जठार, निमगाव केतकीचे शहराध्यक्ष गणु काका घाडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी निमगाव केतकी मधील प्रलंबित विषयवार चर्चा करून लवकरच यावरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे व निमगाव केतकी बरोबरच इंदापूर तालुक्यातील इतर कामांनाही वेग मिळणार आहे असे हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी सांगितले.