
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मौजे पेंडू येथील आषाढी एकादशी निमित्त जाणाऱ्या भाविक भक्तांना राष्ट्रवादी काँग्रेस तालुका शाखा लोहाच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले.
आज दिनांक १० जुलै रोजी पवित्र आषाढी एकादशी असल्यामुळे आज पंढरपूरच्या विठ्ठू माऊलींच्या दर्शनासाठी राज्यातून लाखो भाविक भक्त जातात आषाढी एकादशी चा पवित्र लाखो भाविक भक्त पाळतात
तसेच यात लोहा तालुक्यातील मौजे पेंडू येथे आषाढी एकादशीला योगीराज श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची ही यात्रा भरते या यात्रेला लोहा, कंधार,पालम आदी तालुक्यातील हजारो भाविक भक्त आषाढी एकादशी उपवास ठेवून पायी जातात या भाविक भक्तांना फराळाची सोय व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोफत फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा तालुका अध्यक्ष संजय पाटील कराळे, उपाध्यक्ष राम पाटील पवार,अजय हंकारे, नवनाथ गिरी आदि उपस्थित होते.
अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा तालुका उपाध्यक्ष राम पाटील पवार यांनी दिली.