दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
मंगनाळी :- येथील शेतकरी भिमराव देवराव अभंगे या शेतकऱ्याची ८० हजार रुपये किमतीची म्हैस मंगनाळी येथील पुलाजवळील शेतीमध्ये म्हैस चरत होती. पाऊस चालू असल्यामुळे लाईटच्या खांबाच्या तनाव्याला चिटकून म्हैस ठार झाली, असून पेठवडज पोलीस चौकी च्या अधिकारी व कर्मचारी यांनी म्हैसीचा पंचनामा केला असून म्हैस ठार झाल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे. तेंव्हा महावितरणने नुकसान भरपाई देण्याची शेतकरी भिमराव अभंगे यांनी मागणी केली आहे.
