
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात एक नवी कार्यसंस्कृती रुजवल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालय,कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, सेवानिवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अवकाश या खात्यांचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. जात, पंथ, धर्म किंवा मतपेटीचा विचार न करता गरीब आणि लोक कल्याणाच्या योजना समाजातल्या सर्वात गरजू किंवा तळातल्या माणसापर्यंत पोहोचणाऱ्या योजना आखणारी ही कार्य संस्कृती असल्याचे ते म्हणाले. समकालीन भारताच्या परिस्थितीचा विचार करून, पंतप्रधानांनी सतत स्टार्टअपला चालना दिली आहे. ज्यामुळे प्रत्येक नागरिक स्वतःची रोजीरोटी कमावण्यास सक्षम होतील याचा विचार केला गेला, असंही त्यांनी नमूद केल.ते आज उत्तरप्रदेश मधील मुरादाबाद येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.
8 वर्षांच्या अल्प कालावधीत, केंद्र सरकार अनेक योजना 100% यशस्वी होण्याच्या जवळ पोहोचल्या आहेत आणि “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या तत्त्वाचे पालन करून पात्र लोकांना या योजनांचा लाभ दिला जात आहे.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, गरीब कल्याण अन्न योजना, जन धन योजना, उज्ज्वला योजना, पीएम आवास योजना, हर घर जल योजना, हर घर बिजली योजना आणि आयुष्मान भारत योजना यासारख्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या योजनांमुळे देशातील जनतेने केंद्रात आणि बहुतांश राज्यांमध्ये मोदी सरकारवर पुन्हा विश्वास दाखवला आहे.
तरुणांमध्ये स्टार्टअप आणि तंत्रज्ञान विषयी,तसेच विविध स्टार्टअप्सना सरकारकडून देण्यात येणार्या आर्थिक सहाय्याविषयी आणि स्टार्ट अप च्या विशाल आणि अद्याप न चोखाळलेल्या मार्गांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
मोदी सरकारने, आठ वर्षांच्या कार्यकाळात देशातल्या ‘युवा शक्ती’ आणि ‘नारी शक्ती’च्या आशा-आकांक्षा, ध्येय आणि उद्दिष्टे यांना महत्त्व देत युवा आणि नारी शक्तीसाठी नवी पहाट आणि नवी दिशा दिली आहे, असेही डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.