
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई विभागाने 08 जुलै 2022 रोजी ठाण्यात भिवंडी येथे छापे टाकत जप्तीची कारवाई केली.कंपनीच्या ठिकाणी छापे टाकल्यानंतर, मे. अलका लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेड, (इमारत A-12, गाळा क्रमांक 5 आणि 6, प्रितेश कॉम्प्लेक्स, भिवंडी माणकोली रस्ता , वाल गाव , भिवंडी-421302, ठाणे) यांनी दिनांक 13.02.2020.रोजी जारी करण्यात आलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे 687(ई ) उल्लंघन केलेले आढळले. यावेळी आयएस 15392 नुसार 12 इंच आकाराचे 2700 पेक्षा जास्त अॅल्युमिनियम फॉइल जप्त करण्यात आले.
भारतीय मानक ब्युरोच्या मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 नुसार दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान 2,00,000 रुपये दंडाची किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात.या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.ही छापे आणि जप्तीची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये सायंटीस्ट – C पदावरच्या निशिकांत सिंह आणि आशिष वाकळे यांचा समावेश होता.भारतीय मानके 15392 नुसार “ खाद्यपदार्थ पॅकेजिंगसाठी अॅल्युमिनियम आणि अॅल्युमिनियम मिश्र धातु बेअर फॉइल” वरील गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन तपासण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती.
बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने तयार करून ग्राहकांना मोठ्या नफ्यासाठी विकली जात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. खरेदी करण्यापूर्वी http://www.bis.gov.in या भारतीय मानक ब्युरोच्या संकेतस्थळाला भेट देऊन उत्पादनावर आयएसआय चिन्हाची सत्यता तपासावी अशी विनंती सर्वाना करण्यात येत आहे.
नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांना कोणत्याही उत्पादनावर आयएसआय चिन्हाचा गैरवापर केल्याचे आढळल्यास,ही माहिती प्रमुख ,एमयुबीओ -II, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, भारतीय मानक ब्युरो, दुसरा मजला, एनटीएच (WR), प्लॉट क्रमांक एफ -10, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व ), मुंबई – 400093.येथे कळवावी. hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारेही अशा तक्रारी करता येतील. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल
स्रोत: भारतीय मानक ब्युरो, मुंबई शाखा कार्यालय – II