
दैनिक चालू वार्ता पूणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना परसबागेत जाऊन कारले ,दोडके, गवार, श्रावणी घेवडा ,भोपळा, वाल, वांगी, पपई , पेरू, घोसाळे कडीपत्ता,संस्थेचे कार्यकर्ते यांनी नागरीकांच्या घरी जाऊन लावले व ज्यांच्याकडे परसबाग नाही अशा नागरिकांना प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांच्या घरी कुंढीत लावण्यासाठी बिया मोफत दिल्या.
नागरिकांनी मदत मागितल्यावर लावण्यासही मदत केली.
मुख्यत्वे करून नवी सांगवी, पिंपळे गुरव ,डांगे चौक, काळेवाडी, चिंचवड गाव,आकुर्डी व आजुबाजूच्या उपनगरातही फळभाज्यांच्या बियांचे वाटप करण्यात आले.
यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले की, आम्ही गेल्या आठवड्यापासून हा उपक्रम राबवीत आहोत. सध्या यांत्रिकीयुगात आपल्या परसबागेसाठी पुरेसा वेळ देता येत नाही किंवा काहीं नागरिकाकडे परसबाग ही नाही. बरीच माणसे भाज्या विकत घेणे पसंत करतात. म्हणुनच “परसबाग फुलवू आपल्या अंगणी” हा उपक्रम शहरातील सर्व भागात राबविला आहे. बहिणाबाई यांच्या कवितेतून सांगायचे तर *धरित्रीच्या कुशीमधी बियबियाने निजली आहेत* काही दिवसात घरच्या घरी फळभाज्या खायला मिळणार आहेत.
यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती तीन एम.एल. कीटकनाशके फळांच्या व भाज्यांच्या माध्यमातून दररोज खात आहे, यामुळे सर्वाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो ज्यांच्याकडे वेळ आणि परस बागेत जागा आहे किंवा टेरेसवर जागा असेल त्यांनी आपल्या जागेत जरूर भाज्या लावाव्यात व फवारणी न केलेली स्वतः पिकवलेल्या फळभाज्या खाव्यात यामुळे आपल्याला आनंदही मिळेल आणि पैशाची बचत होईल .
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की, सध्या कामगार संकल्पना लुप्त होत चालली आहे, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी अशा वेगवेगळ्या संकल्पना राबवून घरच्या घरी पालेभाज्या लावाव्यात म्हणजे रसायनमुक्त भाजी आपल्या कुटुंबाला मिळेल व आर्थिक हातभार लागेल आणि नवीन पिढीलाही याची माहिती होईल.आपल्या छोट्या मुलांबरोबर हा उपक्रम केला तर त्यांचे कृषीविषयक ज्ञान वाढेल हाच आमचा मुख्य उद्देश आहे.प्रगती घोरपडे यांनी इंग्लंड येथे कुढीत बीया लावून आम्हाला फोटो पाठवले.
यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, तसेच महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले ,विकास शहाणे, मुरलीधर दळवी, सुभाष चव्हाण, सचिन करंजवणे,संजना करंजावणे, डॉ. भाऊसाहेब लोंढे ,जयश्री गुमास्ते ,अरविंद मांगले, मीना करंजवणे,वसंतराव चकटे, अलकाताई लोंढे, धनंजय महाले, गजानन धाराशिवकर यांनी सहभाग नोंदवला. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील कवी, लेखक सहभागी झाले.