दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : प्रियकर आणि प्रेयसी दोघेही पुण्यातील एका लॉजवर गेले होते. त्याठिकाणी प्रेयसीला लॉजवर आणल्यानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची गळा चिरुन हत्या केली. दुसऱ्या दिवशी रुमची साफ-सफाई करायला आलेल्या कामगाराने रुमची पाहणी केली. यावेळी त्याला बाथरुममध्ये तरुणीचा मृतदेह हा रक्क्ताच्या थारोळ्यात दिसून आला. दिप्ती काटमोडे वय २४ असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील स्वारगेट-सातारा रस्त्यावरील शितल लॉजवर घडली.
या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. यानंतर याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिप्ती तिच्या प्रियकरासोबत लॉजवर रात्री आली होती. यानंतर तिची हत्या झाली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी हा फरार आहे. तसेच पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
