
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यालयात पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. हरिनामाच्या गजर करत ही दिंडी विद्यालयापासून ते भोरखेडा गावातून काढण्यात आली. पालखी सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी श्री. राजेंद्र सिंग राजपूत यांच्या शुभहस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले. त्यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकही उपस्थित होते. गावातील विठ्ठल मंदिरात या पालखी सोहळ्याची संत तुकाराम ,ज्ञानदेव व पांडुरंगाच्या आरतीने सांगता झाली. गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री उज्वलसिंग राजपूत व सौ. नितादेवी राजपूत या दाम्पत्याच्या शुभहस्ते मानाची आरती करण्यात आली. या पालखी सोहळ्याच्या आयोजन आणि यशस्वीतेसाठी मुख्या. श्री ईश्वर पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली सौ रेखा माळी, सौ सीमा तेले, श्री संदीप चौधरी, श्री लक्ष्मण साळुंखे श्री अक्षय राजपूत, श्री शांतीलाल शिरसाठ इत्यादी शालेय कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेतली.