
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर
प्रतिनिधी-दि.09/07/22 रोजी.प.पू.गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त चिमुकली शाळकरी विद्यालयात वारकरी वेशभूषेत अभंग सादर करून सर्वांना पंढरपूर तिर्थक्षेत्री असल्याचा अनुभव दिला.
दिर्घकाळानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे जतन करत विठू माउलीचा नामस्मरण करत कार्यक्रमाचा आनंद घेतला.या कार्यक्रमास देगलूरचे नामांकित किर्तनकार यादवराव झरीकर महाराज व त्यांच्या मातोश्री तसेच ज्येष्ठ शिक्षिका कुलकर्णी स्मिता मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे जाधव सचिन यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. सुरशेटवार अर्चना यांनी विठ्ठल नामाची शाळा भरली…. पद्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते झरीकर महाराज यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व व त्यामागचा इतिहास सांगत असताना भक्त पुंडलिका सारखी माता पिता ची सेवा हीच खरी ईश्वर भक्ती असते.असे याप्रसंगी म्हणाले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी अभंग सादरीकरण केले.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शेवटी हरिपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कदम अश्विनी यांनी सादर केले.आभार प्रदर्शन कलोपासक मंडळ प्रमुख बेजगमवार सविता, सूत्रसंचलन पांचारे रूपा यांनी केले.या कार्यक्रमा च्या यशस्वीते साठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक सहकार्य केले.