
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिताताई दीघडे यांनी थेट काँग्रेस पक्षावर निशाणा साधत भाजप च्या देशभक्तीवर कोणत्या तोंडाने पत्रकार परिषद घेऊन आक्षेप घेत आहे?असा सवाल आ.यशोमतीताई ठाकूर यांना केला.
काँग्रेसचा हात सदैव दहशतवादयांवर होता त्यांनी भाजपा पक्षावर बिनबुडाचे आरोप करून बदनाम करू नये.भाजपाच्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्या काँग्रेस व मंत्रीपद निराश माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वतःमध्ये झाकून पहावे.उगीचच दुसऱ्यांवर आरोप करू नये;मग बुडाखाली किती अंधार आहे ते कळेल?एव्हढ्यावरच भाजपा जिल्हाध्यक्ष थांबल्या नाहीत तर उमेश कोल्हे यांच्या मारेकऱ्यांना वाचविण्याचे पाप काँग्रेसनेच केले असे असतांना यशोमती ठाकूर कोणत्या तोंडाने पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या देशभक्तीपर आक्षेप घेत आहे?असा थेट आरोप सुद्धा भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता दीघडे यांनी केला.