
दैनिक चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी -प्रा.मारोती बुद्रुक पाटील
नागठाणा तालुका अहमदपूर येथील रहिवासी
असलेले विनोद लोखंडे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने उभा विटेवरी या ऑडिओ अल्बमची निर्मिती केली असून त्याचा उद्घाटन सोहळा मुंबईमध्ये संपन्न झाला.
मुंबई ठाणे येथे या अल्बमचे उद्घाटन माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे,
सचिन खूपसे, श्रीकांत डावरे,आनंद कर्डक,जयेश ठाकूर, या ऑडिओ अल्बमचे निर्माते विनोद लोखंडे आदींची उपस्थिती होती.
या अल्बम मध्ये सावळ्या विठ्ठला दर्शन दे मला,भोळा भक्त हरी तुझा, तुला भेटाया विठ्ठला मी आलो चालून,उभा विटेवरी अशा सुंदर गीताची निर्मिती विनोद लोखंडे यांनी केली असून या गीताला स्वरसाज चढवलाय प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांनी पंढरीच्या पांडुरंगावर हि गीते आपल्या सुंदर आवाजात गायले असून या गीतासाठी
संगीत प्रमोद विनोद यांचे असून
म्युझिक डायरेक्टर बाबा जागीरदार यांचे आहे.
विनोद लोखंडे हा सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी असून त्याने शिक्षण घेत असतानाच त्यांना या संगीताची आवड होती सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे सरांनी निर्माण केलेल्या अनेक नाटकात व सांस्कृतिक कार्यक्रमात आश्चर्यकारक ट्रिपल सुद्धा वाजवलेली होती.घरात संगीताचे कुठलेही साधन नसताना मिळेल त्या साहित्यावर विनोद लोखंडे सराव करत असे कविता लिहिणे गीत लिहिणे त्याला चाली बसवणे हा त्याचा छंद त्यांनी कधीही बंद केला नाही.मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये अनेक संगीतकार व कलाकारांच्या सोबत तो काम करतो आहे. सुप्रसिद्ध शाहीर प्रमोद लोखंडे यांनीही स्वतःचे नाव महाराष्ट्रभर केले आहे. शिक्षण क्षेत्रात अहमदपूर लातूर पॅटर्न निर्माण झाला आता संगीताच्या या क्षेत्रात अहमदपूरचाही पॅटर्न निर्माण होतो आहे विनोद प्रमोद ही जोडी संगीत क्षेत्रामध्ये नक्कीच नाव करेल यात शंका नाही.