
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
अक्कलकुवा: 30 एप्रिल रोजी घेतल्या गेलेल्या नवोदय पात्रता परीक्षेचा निकाल लागला असून जि.प.केंद्र शाळा जुने धडगाव शाळेतील तेरा विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुवा येथे इयत्ता सहावी साठी 1) कु.श्रुतिका दिपक पावरा, 2)विराट राजेश देवकर, 3)निर्मय प्रविण वळवी, 4)विकी खुमानसिंग वळवी, 5)कृतिका गुलाबसिंग वळवी, 6)खुशी मंगल पावरा,7) हिमांशु श्रीकांत शिवदे, 8)अर्जुन दिलवरसिंग पावरा, 9)तन्वी दिनेश शिंदे, 10)अनुकुमार गणेश पाडवी, 11)अंकुर अमोल ठिंगळे, 12)प्रतिक्षा रतनसिंग वळवी, 13)रोहित गोविंद वसावे या विद्यार्थांची निवड झाली आहे.तर एकलव्य माँडेल रेसिडेंशिएल स्कूल प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षेतही या शाळेतील ४० (चाळीस ) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून या गुणवंत विध्यार्थ्यांसाठी सुनंदा निकवाडे, विद्या पाटील, रंजू वाडीले, मीना गावीत, प्रमोद बोरसे, सुवर्णा पाटील, ललिता पावरा, नारसिंग वसावे, सुरेंद्र जोशी, रंजिता गावीत, शशिकला पवार, होमी वळवी, प्रदीप दरेकर या शिक्षकवृंदाचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोकदादा पराडके यांनी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील व गुणवंत विध्यार्थी व शिक्षकांचे यांचे अभिनंदन केले आहे.