
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा तालुक्यातील बोरगाव अ येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज गोविंदराव तेलंगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व बोरगाव येथील शेतकऱ्यांना व मजुरांना प्रधानमंत्री ई- श्रम कार्ड मोफत काढुन देण्यात आले.
जन्मदिनी रक्तदान करून ,नांदेड येथील धनेगाव येथील अंध विद्यालय मध्ये एक दिवस मोफत अन्नदान करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मा व्यंकटेश भैया मामीलवाड यांची प्रमुख उपस्थित ह़ोते. तसेच स्थलांतरित झालेले कुटुंब त्या कुटुंबातील मुलांना त्यांना शिक्षणाची गोडी लागावी या उद्देशाने त्यांना मोफत पुस्तक वाटप करण्यात आले अशा प्रकारे अनेक सामाजिक, शैक्षणिक ,राजकिय क्षेत्रातील मान्यवर यांनी सुध्दा फोनच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.