
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
वारकरी संप्रदायात लोहा -कंधार मतदार संघाचे माजी आमदार रोहिदास चव्हाण रमले .पंढरपूर च्या विठठू माऊलींच्या दर्शनासाठी समर्थ धोंडू तात्यांच्या दिंडीत सहभागी झाले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठोबाच्या दर्शनासाठी राज्यातून लाखो भाविक भक्त, वारकरी मंडळी मोठ्या प्रमाणात जातात .
मागील दोन वर्ष कोरोनाचा काळात पंढरपूर ची विठ्ठलाची यात्रा बंद होती कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे यंदा दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच पंढरपूर ची यात्रा मोठ्या उत्साहात भरत आहे. या यात्रेला राज्याभरातून लाखो भाविक भक्त वारकरी मंडळी सांप्रदायिक वर्ग लाखोंच्या संख्येने येऊन श्री विठ्ठल – रुक्मिणी चे दर्शन घेतात.
यात लोहा-कंधार मतदार संघाचे सांप्रदायिक वर्गातील माजी आमदार रोहिदास चव्हाण हे गेल्या २८ वर्षापासूनआळंदी ते पंढरपूर या पायी दिंडीत सपत्नीक सामिल होऊन विठठू माऊलींचे दर्शन घेतात .
यावेळी प्रथमच दोन वर्षांनंतर लोहा -कंधार चे माजी आमदार रोहिदास चव्हाण हे समर्थ धोंडू तात्यांच्या दिंडीत आळंदी ते पंढरपूर यात्रेसाठी दिंडी क्रमांक २४५ मध्ये सहभागी होऊन आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास करून पंढरपूर येथे पोहचवून श्री विठ्ठू माऊलीचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्या पत्नी लोहा न.पा. च्या माजी नगराध्यक्षा सौ.आशाताई रोहीदास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाबाराव पाटील हालगे व त्यांच्या पत्नी आदी उपस्थित होते.