
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश नामदेव माने
जालना दि. 11 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांमार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरु करण्यात आलेले असून या योजनेमध्ये जालना जिल्ह्यातील आर.पी. इंग्लिश स्कुल, बदनापुर, ता.बदनापुर, जि.जालना या शाळेची निवड झालेली आहे. शासनाने वेळोवेळी घोषीत केलेल्या धनगर व त्यांच्या उपजाती या मधील विद्यार्थ्यांना शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या सर्व सोयी – सुविधा मोफत उपलब्ध असून या शाळेत या योजनेंतर्गत अर्ज तात्काळ करणे आवश्यक असून प्रवेश घेण्याकरिता सहायक आयुक्त, समाज कल्याण,जालना या कार्यालयांकडे किंवा कार्यालयाच्या अंतर्गत शासकीय निवासी शाळा बदनापुर, तसेच मुख्याध्यापक, आर.पी. इंग्लिश स्कुल, बदनापुर, ता.बदनापुर, जि.जालना येथे भेट देऊन अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक, आर.पी. इंग्लिश स्कुल, बदनापुर, ता. बदनापुर, जि.जालना यांचे भ्रमणध्वनी क्र. 9545737575 यावर संपर्क करावा.
सदर योजनांसाठी प्रवेश घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे.
सदर योजनांसाठी प्रवेशित विद्यार्थी हा धनगर व त्यांच्या उपजाती मधील असावा व त्याबाबतचे जात प्रमाणपत्र असावे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता 01 ते 05 वी वर्गात प्रवेशित असावा.
इयत्ता 01 मध्ये प्रवेश घेतल्यास जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे.
पालकाचे वार्षिक उत्पन्न हे रु.1 लक्ष (अक्षरी रुपये एक लाख) च्या आत असणे आवश्यक आहे.
वरील सर्व अटींची पुर्तता करत असलेल्या धनगर व त्यांच्या उपजाती मधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमित घवले, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.