दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
नांदेड:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचा इशारा नुसार जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टी व पुराची संभावणा पाहता शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.त्यानुसार नांदेड जिल्ह्यात दिनांक १३/०७/२०२२ रोजी अतिवृष्टीचा धोका असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.त्यामुळे संभाव्य पूराची परिस्थिती विचारात घेता नांदेड जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापनच्या प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिनांक १३/०७/२०२२ या दिवशी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
