
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-हवामान खात्याने विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने नदी- नाल्यांना मोठया प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन मोर्शीचे तहसीलदार श्री.एन.आर.हिंगोले यांनी केले.
नदी-नाल्यांना मोठया प्रमाणात पूर परिस्थिती वर्तविल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन आपल्या गावातील तलाठी,कृषिसेवक, ग्रामसेवक,पोलीस पाटील यांना लगेच कळवावे.नागरिकांची अश्या परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे आणि झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन सुद्धा तहसीलदार श्री.एन. आर.हिंगोले यांनी केले.