
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
शासनाकडून वित्त आयोगाच्या निधीतून संगणक परिचालक यांची CSC SPV या कंपनीकडून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली असून धुळे जिल्ह्यातून शिरपूर तालुक्यातील 108 संगणक परिचालकांची 118 ग्रामपंचायतींसाठी नियुक्ती करण्यात आली आहे संबंधित सर्व ग्रामपंचायतचे 15 व्या वित्त आयोगातून कंपनीकडे निधी वर्ग करण्यात आलेला असूनही संगणक परिचालकांना कंपनीकडून चार ते सहा महिन्यापासून मानधन देण्यात येत नाही ते मानधन वेळोवेळी मिळावे यासंदर्भात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना धुळे जिल्हा व शिरपूर तालुका यांच्याकडून दिनांक 12 जुलै 2022 पासून कामबंद आंदोलन करण्यात आले आहे यासंदर्भात तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात म. गटविकास अधिकारी यांना व तालुका समन्वयक यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनाची दखल घेऊन म. गट विकास अधिकारी सो पंचायत समिती शिरपूर यांनी त्यांच्या निवेदनाच्या संदर्भाने वरिष्ठ कार्यालयास कळविले आहे संगणक परिचालकांच्या या कामबंद आंदोलनामुळे सर्व ग्रामपंचायतचे ऑनलाईन कामकाज आजपासून ठप्प झाले आहे त्यामुळे गावातील नागरिकांना व संबंधित सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांना कामकाज करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे या संदर्भात शासनाकडून कंपनीला त्वरित मानधन देणे संदर्भात सूचित करण्यात यावे अशी मागणी संगणक परिचालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर माळी व जिल्हा सचिव जितेंद्र राजपूत व यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष श्री तुषार पाटील तालुका महिला अध्यक्ष श्रीमती श्वेता गुजर उपाध्यक्ष श्री. अशोक पावरा सचिव श्री. गौरव पाटील तसेच त्यांच्यासोबत शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक उज्वला मराठे, राखी पंडित, मनीषा माळी, स्नेहल मोरे, सुशील पवार, फकीरा बिराडे, महेंद्र ढिवरे जगदीश राठोड, गोपाल कोळी, व इतर सर्व संगणक परिचालक यावेळी उपस्थित होते.